Calculate Capital gain on SIP – SIP मध्ये भांडवली नफा कसा काढावा.

Calculate Capital gain on SIP – SIP मध्ये भांडवली नफा कसा काढावा.


बरेच गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे (systematic investment plan -SIP) गुंतवणूक करतात. SIP पध्दतीने गुंतवणूक करणे म्हणजे प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करणे होय. या दर महिन्याला होणाऱ्या गुंतवणुकीच्या बदल्यात NAV प्रमाणे म्युच्युअल फंडाचे युनिट्स आपल्या खात्यामध्ये जमा होतात. योजनेची NAV रोज बदलत असते. प्रत्येक योजनेची NAV ही रोज प्रकाशित होत असते. मागील पोस्ट मध्ये म्युच्युअल फंडाच्या कराविषयी माहिती घेतली. या पोस्ट मध्ये SIP पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीस भांडवली नफा कसा  काढावा (Calculate Capital gain on SIP )हे पाहू.

समजा दर महिन्याच्या १ तारखेला SIP (इक्विटी फंड) चालू केली. तर खालीलप्रमाणे व्यवहार होईल.

SIP टेबल

SIP Month SIP Amount Purchase NAV Unit Brought
01/01/2016 5,000.00 60 83.33
01/02/2016 5,000.00 62 80.65
01/03/2016 5,000.00 64 78.13
01/04/2016 5,000.00 65 76.92
01/05/2016 5,000.00 66 75.76
01/06/2016 5,000.00 63 79.37
01/07/2016 5,000.00 61 81.97
01/08/2016 5,000.00 58 86.21
01/09/2016 5,000.00 64 78.13
01/10/2016 5,000.00 65 76.92
01/11/2016 5,000.00 68 73.53
01/12/2016 5,000.00 70 71.43
60,000.00 942.33

वरील SIP १ जानेवारी, २०१६ पासून चालू केली आहे. या SIP मधून १ मार्च, २०१७ रोजी आपणास ३०० युनिट्स विक्री करायची आहे तर भांडवली नफा किती असेल. वरील SIP हि इक्विटी फंड आहे.  इक्विटी फंडसाठी भांडवली नफा (१ वर्षपेक्षा कमी कालावधीसाठी लघु मुदतीचा भांडवली नफा (Short Term Capital Gain)  तर १ वर्षपेक्षा अधिक कालावधीसाठी दीर्घ मुदतीचा  भांडवली नफा (Long Term Capital Gain))  कसा काढावा.

विक्री टेबल (विक्री –  मार्च, २०१७)

Unit Purchase Date Units Sell Sell NAV Amount Holding (Yrs) Type of Capital Gain
01/01/2016 83.33 90 7,500.00 1.16 LTCG*
01/02/2016 80.65 90 7,258.06 1.08 LTCG
01/03/2016 78.13 90 7,031.25 1.00 LTCG
01/04/2016 57.92 90 5,212.80 0.92 STCG**
300.02 27,002.11

* LTCG  (Long Term Capital Gain) – दीर्घ मुदतीचा  भांडवली नफा

** STCG  (Short Term Capital Gain) – लघु मुदतीचा भांडवली नफा

स्पष्टीकरण – ( Calculate Capital gain on SIP)

SIP टेबल मध्ये १२ महिने केलेल्या SIP मधून वेगवेगळ्या NAV प्रमाणे युनिट्स ची खरेदी झाली आहे. रुपये ६०,००० च्या गुंतवणुकीवर आपणांस वर्ष अखेरीस एकूण ९४२.३३ युनिट्स जमा झालेले आहेत. या युनिट्स पैकी काही कारणास्तव आपण २ मार्च, २०१७ रोजी ३०० युनिट्स विकायचा निर्णय घेतला. युनिट्स ची विक्रीसाठी १ मार्च, २०१७ रोजी NAV रुपये ९० होती.

युनिट्स विक्री करतेवेळी भांडवली नफा काढताना प्रथम खरेदी केलेले युनिट्स प्रथम विकले जातील. (FIFO method – First In First Out)

टेबल २ मध्ये विक्रीचा व्यवहार दाखवलेला आहे. आता ३०० युनिट्स विक्री करायची म्हणजे प्रथम जानेवारी,२०१६ मध्ये खरेदी केलेले ८३. ३३, फेब्रुवारी २०१६ मध्ये खरेदी केलेले ८०. ६५, मार्च २०१६ मध्ये खरेदी केलेले ७८.१३ आणि एप्रिल २०१६ मध्ये खरेदी केलेले ७६.९२ पैकी ५७.९२ युनिट्स ची विक्री होईल.

इक्विटी फंडसाठी भांडवली नफा हा १ वर्षपेक्षा कमी कालावधीसाठी लघु मुदतीचा भांडवली नफा तर १ वर्षपेक्षा अधिक कालावधीसाठी दीर्घ मुदतीचा  भांडवली नफा असतो. म्हणून जानेवारी ते मार्च मधील युनिट्स दीर्घ मुदतीचा  भांडवली नफा आणि एप्रिल चे युनिट्स हे लघु मुदतीचा भांडवली नफा म्हणून विचारात घेतले जातील.

इक्विटी आणि संदर्भातील (Equity and Equity Oriented) म्युच्युअल फंडासाठी दीर्घ मुदतीचा टॅक्स लागू नाही परंतु लघु मुदतीचा टॅक्स द्यावा लागतो. (१२ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची गुंतवणूक). लघु मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी टॅक्स हा १५% दराने द्यावा लागतो

म्युच्युअल फंडाच्या कर विषीयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *