Mutual fund taxation – म्युच्युअल फंड कर रचना

Mutual fund taxation – म्युच्युअल फंड कर रचना


प्रत्येक गुंतवणूकदार गुंतवणूक पर्याय निवडताना आपल्या जोखीम घेण्याची क्षमतेनुसार निवड करतो. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे महत्वाचे घेतो, तो म्हणजे म्युच्युअल फंडावरील कर (Mutual fund taxation). म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपल्या टॅक्स प्रोफाइल नुसार योजनांची निवड करावी लागते. कर (Tax)या विषयाची खूप मोठी व्याप्ती आहे. या पोस्ट मध्ये म्युच्युअल फंडाच्या कराविषयी (Mutual Fund Taxation) जाणून घेणार आहोत.

भांडवली नफा म्हणजे काय- What is Capital Gain?

भांडवली नफा म्हणजे गुंतवणूकदाराने गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडाचे युनिट्स नफ्यामध्ये विकणे. उदा. आपण एका योजनेचे १ जानेवारी, २०१६ ला रुपये १०० NAV प्रमाणे २०० युनिट्स खरेदी केले (गुंतवणूक रक्कम १००x२००=२०,०००) आणि १० जानेवारी,२०१७ ला रुपये १२० NAV प्रमाणे २०० युनिट्सची विक्री केली तर या गुंतवणुकीमधून १२० x २००=२४,००० रुपये मिळतील. या व्यवहारात रुपये २४,००० – २०,०००=रुपये ४,००० नफा होईल. या नफ्यास भांडवली नफा असे म्हणतात. उलटपक्षी गुंतवणुकीपेक्षा विक्री मूल्य कमी असेल तर त्यास भांडवली तोटा असे संबोधले जाते.

भारतीय कर रचनेनुसार भांडवली नफा दोन प्रकारचा असतो. एक लघु मुदतीचा (Short term Capital Gain – STCG) आणि दुसरा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा (Long Term Capital Gain – LTCG). म्युच्युअल फंडामध्ये इक्विटी आणि डेट प्रकारच्या फंडासाठी नियम वेगवेगळे आहेत. काय ते आपण समजून घेऊ.

Mutual fund taxation - म्युच्युअल फंड कर रचना

इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी टॅक्स (Tax on Equity Mutual Fund):

इक्विटी आणि इक्विटी संदर्भातील (Equity and Equity Oriented) म्युच्युअल फंड म्हणजे असे म्युच्युअल फंड की ज्याची सरासरी ६५% गुंतवणूक (65% of total Portfolio) ही देशांतर्गत इक्विटी शेअर्स मध्ये असावी. या प्रकारच्या  म्युच्युअल फंडातील गुंतवणूक १२ महिनेपेक्षा अधिक असेल तर त्यास दीर्घ मुदतीचा भांडवली नफा असे म्हणतात. उलटपक्षी १२ महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठीच्या नफ्यास लघु मुदतीचा भांडवली नफा असे म्हणतात. असा नफा फक्त म्युच्युअल फंड युनिट्स ची विक्री केल्यानंतरच ग्राह्य धरला जातो. इक्विटी आणि संदर्भातील (Equity and Equity Oriented) म्युच्युअल फंडासाठी दीर्घ मुदतीचा टॅक्स लागू नाही परंतु लघु मुदतीचा टॅक्स द्यावा लागतो. (१२ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची गुंतवणूक). लघु मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी टॅक्स हा १५% दराने द्यावा लागतो. त्या बरोबर STT (Security Transaction tax) ०.००१% द्यावा लागतो. शिवाय या प्रकारच्या फंडावर मिळणारा लाभांश (Dividend) करमुक्त असतो.

डेट फंडावरील टॅक्स  (Tax on Debt Mutual Fund):

डेट फंड की ज्यांची एकूण गुंतवणुकीपैकी ६५% गुंतवणूक ही डेट गुंतवणूक प्रकारात केली जाते. या प्रकारच्या फंडामध्ये गुंतवणूक ही ३६ महिनेपेक्षा कमी कालावधीसाठी असेल तर त्यावर होणाऱ्या नफ्यास लघु मुदतीचा भांडवली नफा (Short term Capital Gain – STCG) असे म्हणतात. त्यावरील कालावधीच्या  गुंतवणूकित होणार नफा हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा (Long Term Capital Gain – LTCG) मानला जातो.

लघु मुदतीचा भांडवली नफा (Short term Capital Gain – STCG)  हा गुंतवणूकदारांच्या व्यक्तिगत टॅक्स स्लॅब प्रमाणे आकाराला जातो. उदा. गुंतवणूकदार जर १०% टॅक्स स्लॅब मध्ये येत असेल तर त्यास १०% भांडवली नफा कर  द्यावा लागेल.

दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर (Long Term Capital Gain tax – LTCG) हा दोन प्रकारे काढला जातो.

  1. इंडेक्सशन पद्धतीने: इंडेक्सशन म्हणजे गुंतवणुकीचे महागाईच्या दराशी समायोजन (adjustment) केले जाते. महागाईमुळे पैशाचे मूल्य कमी होते. त्यामुळे Cost Inflation Index – CII (परिव्यय (खर्च) अतिवृद्धी निर्देशांक) वापरून गुंतवणुकीच्या वेळी असलेला इंडेक्स आणि विक्रीच्या वेळी असणारा इंडेक्सशी अडजस्टमेंट केली जाते. इंडेक्सशन पद्धत वापरून येणाऱ्या रकमेवर २०% दराने दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर (Long Term Capital Gain tax) द्यावा लागतो.
  2. इंडेक्सशन शिवाय: १०% दराने दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर द्यावा लागतो.

याशिवाय डेट फंडातील गुंतवणुकीस मिळणार लाभांश हा लाभांश वितरण कर (Dividend Distribution tax)कापून गुंतवणूकदारस मिळतो.

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *