Mutual fund benchmark Index: म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक

Mutual fund benchmark: म्युच्युअल फंडाचा तलचिन्ह निर्देशांक (प्रमाणित संदर्भ निर्देशांक)

Mutual fund benchmark: म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक


आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये स्पर्धा आहे. स्पर्धा म्हटलं की तुलना आली. हे त्याच्यापेक्षा खूप सरस आहे किंवा याच्यापेक्षा त्याची कामगिरी चांगली आहे असं नेहमी ऐकायला मिळतं. अगदी शाळेत असताना परीक्षेत उत्तीर्ण व्हायला 35% गुण लागतात. म्हणजे शालेय परीक्षा पास व्हायला 35% हा मापदंड / बेचमार्क आहे. प्रत्येकाचे बेंचमार्क ठरलेले असतात. गुंतवणुकीचंही तसंच आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर त्याचं मूल्यमापन होणं गरजेचं असतं. गुंतवणूक करावी किंवा नाही हे गुंतवणुकीच्या मागील कामगिरीचे मूल्यमापन करून ठरवता येते. मूल्यमापन करायला संदर्भ लागतो. म्हणजे बेंचमार्क (Benchmark) लागतो. तरच त्याची तुलना करता येणे शक्य आहे. ही तुलना केल्यानंतर गुंतवणुकीचा निर्णय घेता येतो. गुंतवणुक निर्णय घेण्यासाठी इतर बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो त्यापैकी म्युच्युअल फंड योजनेच्या मागील कामगिरीच्या (Past Performance)आढावा घेणे महत्वाचे असते.  येथे आपण म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक (Mutual fund benchmark) याचे महत्व जाणून घेऊ.

म्युच्युअल फंडाचा बेंचमार्क (Mutual fund benchmark)

म्युच्युअल फंडाच्या  कामगिरीचे मुल्यमापन करण्यासाठी प्रत्येक फंडाचा बेंचमार्क दिलेला असतो. भारतीय भांडवली बाजाराचे नियामक सेबीने (SEBI) 2012 मध्ये प्रत्येक फंडास त्याचा बेंचमार्क जाहीर करणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक फंड प्रकाराचा बेंचमार्क वेगळा असतो. बाजारामध्ये तेजी असेल तर शेअरचे भाव वर जातील आणि म्युच्युअल फंडाच्या NAV मध्ये वाढ होईल. मंदी असेल तर विरुद्ध परिणाम असेल. फंडाच्या कामगिरीची तुलना बेंचमार्क केली जाते.

वरील गोष्ट उदाहरणाद्वारे स्पष्ट करू.

उदाहरण म्हणून आपण HDFC TOP 200 (G) या फंडाचा विचार करू. HDFC  FUND ने या फंडाचा बेंचमार्क म्हणून S&P BSE 200 या निर्देशांकास घोषित केले आहे. HDFC TOP 200 (G) या फंडाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. Mutual fund benchmark: म्युच्युअल फंडाचा तलचिन्ह निर्देशांक (प्रमाणित संदर्भ निर्देशांक)

(संदर्भ आलेख : moneycontrol.com)

या फंडाची कामगिरीचा आढावा खालील प्रमाणे असेल.

योजनेचे नाव : HDFC TOP 200 (G)

योजनेचा NAV (४ मार्च, २०१६)  : २९४. ६१६

योजनेचा NAV (०६ मार्च, २०१७) : ३८७.३८६

कालावधी : १ वर्ष

NAV  मध्ये वाढ (टक्केवारी): ३३.९१%

आता यांची तुलना बेंचमार्क इंडेक्स BSE 200 शी करू

BSE 200 (४ मार्च, २०१६): ३१५२. ६३

BSE 200 (०६ मार्च, २०१७): ३८५२.४५

BSE 200 ची एका वर्षातील वाढ (टक्केवारी) : २२.६३%

म्हणजे बेंचमार्क निर्देशांक च्या तुलनेत ११. २८% (३३.९१% – २२.६३%) इतकी वाढ जास्त झाली आहे म्हणून HDFC TOP 200 (G) या फंडाची कामगिरी समाधानकारक आहे असे म्हणता येईल.

समजा HDFC TOP 200 (G) च्या NAV  मध्ये वाढ २२.६३% किंवा त्यापेक्षा कमी झाली असेल तर हि कामगिरी असमाधानकारक मानण्यात येईल.

बेंचमार्क शी तुलना करताना कालावधी हा कमीकमी 1 वर्ष असावा. बाजारामध्ये तात्पुरती घसरण होण्याची अनेक कारणे आहेत त्यामुळे एक वर्षपेक्षा कमी कालावधीसाठी कामगिरी तपासताना त्रुटी येण्याची शक्यता असते.

सक्रिय / क्रियाशील व्यवस्थापित फंड (Activaly Managed Fund) हे व्यावसायिक लोकांकडून चालवले जातात. त्याची किंमत/खर्च आपण AMC ला देतो. खर्च गुणोत्तर लक्षात घेता आपण 2-3% फी देतो. त्यामुळे त्याची वाढ हि बेंचमार्क पेक्षा ५-७% पेक्षा अधिक असावयास हवी. तरच सक्रिय / क्रियाशील व्यवस्थापित फंड (Activaly Managed Fund) मध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल.

सारांश: म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. या योजना बाजाराचे कामगिरीवर अवलंबून असतात. बाजारावर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. गुंतवणूक करण्यासाठी रामबाण असा काही फॉर्म्युला उपलब्ध नाही. बेंचमार्क (म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक) हा अनेक मोजपट्यांपैकी एक मोजपट्टी आहे की ज्याच्या साहाय्याने आपण अंदाज लावू शकतो.

शब्दार्थ:

  • Activaly Managed Fund: सक्रिय/क्रियाशील व्यवस्थापित फंड
  • AMC: Asset Management Company: मालमत्तेचे व्यवस्थापन करणारी कंपनी (म्युच्युअल फंड कंपनी)
  • benchmark :  मापदंड 
  • Benchmark Index: म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक
  • Evaluation: मूल्यमापन
  • Past Performance: मागील काळातील कामगिरी

 

 

 

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *