निश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP


निश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP

बाजारातील गुंतवणुकीमध्ये कमी अधिक प्रमाणात जोखीम असते. प्रत्येक गुंतवणूकदार आपापल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार (Risk Profile) गुंतवणूक पर्याय निवडत असतो. काही गुंतवणूकदार  जोखीम घेणारे आणि काही जण जोखीम नको म्हणणारे असतात. कमी जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे कल असतो. परतावा कमी मिळाला तरी चालेल परंतु गुंतवणूक सुरक्षित असावी अशी मानसिकता असते. अशा गुंतवणूकदारांसाठी बँकांमधील मुदत ठेवी, आवर्ती ठेव, पोस्टमधील गुंतवणूक योजना असे काही मर्यादित पर्याय शिल्लक राहतात. याच्या जोडीला काही म्युच्युअल फंडामधील पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी निश्चित मुदतपूर्ती योजना (Fixed Maturity Plan – FMP) हा एक पर्याय आहे. काय आहे  निश्चित मुदतपूर्ती योजना (Fixed Maturity Plan – FMP)  हे जाणून घेऊ.

निश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP

या प्रकारच्या योजना मुदत बंद (Closed Ended Scheme) प्रकारच्या असतात. त्यांची मुदत ही नवीन योजना (New Fund Offer) सुरु करतानाच जाहीर केलेली असते. नवीन योजना (New fund offer) सुरु होण्याच्या कालावधी मधेच (साधारणपणे योजना सुरु झालेपासून ५-१० दिवस)  पैसे गुंतवता येतात. त्यांनतर म्युच्युअल फंडाकडून पैसे स्वीकारले जात नाहीत. सर्वच म्युच्युअल फंड घराणे (Mutual Fund Houses) वेगवेगळ्या मुदतीच्या FMP योजना बाजारात आणत असतात. मुदत पूर्तीनंतर गुंतवणूकदारास पैसे परत केले जातात. मुदतपूर्व पैसे मिळत नाहीत. म्युच्युअल फंडाकडे जमा झालेली रक्कम निश्चित उत्पन्न देणाऱ्या आणि सुरक्षित प्रतिभूती मध्ये गुंतवली जाते. उदा. नाणे बाजारातील पर्याय, ठेव पावती, बॉण्ड्स, शासकीय प्रतिभूती. FMP चे युनिट्स शेअर बाजारावर नोंदवले जातात. त्या ठिकाणी युनिट्स ची खरेदी विक्री केली जाते. परंतु अशा प्रकारच्या योजनेचे युनिट्स कमी प्रमाणात खरेदी विक्री केली जातात त्यामुळे या गुंतवणुकीस अगदी नगण्य तरलता मिळते.

निश्चित मुदतपूर्ती योजना ठळक गोष्टी (Highlights of Fixed maturity plan – FMP)

 1. ठराविक मुदत (Fixed Maturity Period) (१ महिन्यापासून ते ५ वर्ष )
 2. मुदत बंद योजना (Closed Ended Scheme)
 3. योजना सुरु (New Fund Offer) होताना गुंतवणूक करता येते.
 4. म्युच्युअल फंडाकडून सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक उदा. नाणे बाजारातील पर्याय, ठेव पावती, बॉण्ड्स, शासकीय प्रतिभूती.
 5. किमान रुपये १,००० ते ५,००० गुंतवणूक करता येते म्हणून छोट्या गुंतवणूकदारासही सहभागी होता येते.
 6. या योजना चालवण्याचा खर्च कमी असतो. कारण योजनेचा टर्न ओव्हर कमी असतो.
 7. मुदतपूर्ती नंतर पैसे परत मिळतात. म्युच्युअल फंडाकडून मुदत पूर्व पैसे मिळत नाहीत त्यासाठी शेअर बाजारावर युनिट्स नोंदणी केलेली असते त्या ठिकाणी खरेदी किंवा विक्री करावी लागते.
 8. योजना मुदत बंद असल्याने तरलता (Liquidity) कमी/नगण्य असते.
 9. म्युच्युअल फंडाकडून सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक होत असल्याने गुंतवणूक सुरक्षित मानली जाते (इक्विटी योजनेशी तुलना केल्यास).
 10. कराच्या दृष्टीने फायदेशीर: FMP साठी खालील कर रचना

उदाहरण : Example of FMP

Fixed maturity plan - FMP - Marathi
आलेख सौजन्य: value research

वरील उदाहरणावरून,

 • योजनेचे नाव: ICICI Pridential FMP series 72 plan H Direct
 • एकूण मालमत्ता: रुपये २७६ कोटी
 • योजनेचा प्रकार: मुदत बंद योजना  (closed ended scheme)
 • योजना सुरु दिनांक: २३/०१/२०१४
 • मुदतपूर्ती दिनांक : ०३/१०/२०१७
 • योजना कालावधी (Tenure-days): १३४९ दिवस
 • योजना परतावा: ९.८९%

वरील उदाहरणामध्ये योजनेतर्फे केलेली गुंतवणूक (Portfolio) दाखवण्यात आलेली आहे. सर्व गुंतवणूक उच्च पतमापन असलेल्या बॉण्ड्स आणि डिबेंचर मध्ये करण्यात आलेली आहे.

सारांश:

कमी जोखीम घेणाऱ्या आणि कराच्या दृष्टीने विचार करणाऱ्या लोकांसाठी ह्या प्रकारच्या प्रकारच्या योजना फायदेशीर ठरतात.

 

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *