Credit Rating: पतमापन

Credit Rating: पतमापन


कष्टाने कमावलेला पैसा गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदार नेहमी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आग्रही असतो. मुळात गुंतवणूक हा क्लिष्ट विषय आहे. आपण ज्या कंपनी मध्ये ( shares, bond, Debentures ) गुंतवणूक करतो ती गुंतवणूक भविष्यामध्ये सुरक्षित आहे कि नाही हे कसे ओळखावे. कंपन्याचे व्यवहार बऱ्याचदा क्लिष्ट असतात. ते समजण्यासाठी सखोल आणि अद्यावत ज्ञानाची गरज असते. आणि हे काम वेळखाऊ असते. बऱ्याचदा कंपन्या भांडवलासाठी आकर्षक दराने कर्जरोखे अदा करतात. पण इतक्या चढ्या भावाने परतावा देण्याची क्षमता त्या कंपनी मध्ये आहे का? भविष्यात त्या कंपनीचा नफा-तोटा किंवा भविष्यातील योजना व त्याचा परतावा किती असेल हे गुंतवणुकीच्या वेळी सांगणे अवघड आणि क्लिष्ट आहे. म्हणून त्या कंपनीची बाजारातील एकूण पत काय आहे हे जाणून घेण्यासाठी पतमापन (Credit Rating) बघणे गरजेचे असते. कंपनीची बाजारातील पत आधीच माहित झाल्यामुळे गुंतवणूकदारास गुंतवणुकीचा निर्णय घेण्यास आधार मिळतो. Credit Rating जाहीर केल्यामुळे कंपनीची कर्ज, व्याज परतफेड करण्याची शक्यता किती प्रमाणात आहे हे कळते.

आज बाजारामध्ये सेबीच्या नोंदणीकृत काही संस्था आहेत त्या पतमापन (Credit Rating ) करण्याचे काम करतात. बाजारात कर्जरोखे विक्री करताना कंपनी अशा संस्थाकरवी आपले पतमापन करून घेते (१८ महिन्यापेक्षा जास्त कालावधीच्या कर्जरोखे अदा करताना सेबी कडून कंपनीस पतमापन – Credit Rating बंधनकारक). याचा फायदा गुंतवणूकदार तसेच कंपनीस होतो. त्यासाठी पतमापन संस्थेकडून (Credit Rating Companies) कंपनीस काही फी आकारली जाते. हे पतमापन काही कालावधीसाठी केले जाते. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंपनीस पुन्हा पतमापन करून घ्यावे लागते.

भारतामध्ये SEBI च्या माहितीनुसार (अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ) खालील संस्था /कंपनी पतमापनाचे  (Credit Rating) काम करतात.

 1. CRISIL Limited
 2. Fitch Ratings India Private Ltd.
 3. ICRA Limited
 4. Credit Analysis & Research Ltd. (CARE)
 5. Brickwork Ratings India Private Limited
 6. SME Rating Agency of India Ltd. (SMERA)

Credit Rating ठरवण्यासाठीचे आधारभूत घटक:

 • कंपनीच्या उद्योगाचा प्रकार, तंत्रज्ञान, बाजारातील हिस्सा, कर्ज, भविष्यातील योजना, नफा कमावण्याची क्षमता, इतर स्पर्धक कंपनी, कायदा आणि नियमन इत्यादी.
 • ब्रान्ड मूल्य, गुडविल
 • कामगार संघटना आणि कंपनी संबंध
 • कॅश फ्लो
 • ऑडीट श्रेणी
 • एकूण उद्योगाची आर्थिक स्थिती
 • कंपनीचे भूतकाळातील आर्थिक व्यवहार

Credit Rating आणि अर्थ:

(Credit Rating- AAA, AA, A, BBB, BB, B, C, D)

AAA सर्वात चांगले तर D हे पतमापन दिवाळखोरी दर्शवते. म्हणून AAA, AA, A हे गुंतवणुकीस योग्य, BBB, BB, B गुंतवणुकीस धोका होण्याची शक्यता, C, D गुंतवणुकीस अयोग्य.

साधारणपणे पतमापन हे खालील बाबींसाठी आणि क्षेत्रासाठी केले जाते.

क्रिसिल च्या website नुसार, क्रिसिल खालील बाबींसाठी पतमापन करते:

 • Non-convertible debentures/bonds/preference shares
 • Commercial papers/certificates of deposits/short-term debt
 • Fixed deposits
 • Loans
 • Structured debt

क्रिसिल खालील क्षेत्रासाठी पतमापन करते

 • Industrial companies
 • Banks
 • Non-banking financial companies (NBFCs)
 • Infrastructure entities
 • Microfinance institutions
 • Insurance companies
 • Mutual funds
 • State governments
 • Urban local bodies

 

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *