Capital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना

Capital Protection-Oriented Fund

Capital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना


गुंतवणूक मग ती इक्विटी प्रकारातील असो किंवा डेट प्रकारातील त्यामध्ये जोखीम हि कमी अधिक असतेच. प्रत्येक गुंतवणूकदार स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता (Risk Appetite Profile) ओळखून गुंतवणूक करत असतो. कमी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांनाचा कल नेहमी सुरक्षित गुंतवणुकीकडे असतो. जेणेकरून कमी परतावा मिळाला तरी चालेल पण गुंतवलेली रक्कम सुरक्षित असावी. अशा गुंतवणूकदारांची गरज ओळखून म्युच्युअल फंड भांडवल सुरक्षाभिमुख योजना (Capital Protection-Oriented Fund) जाहीर करतात. काय आहेत Capital Protection-Oriented Fund हे आपण जाणून घेऊ.

भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड (Capital Protection-Oriented Fund)

या योजनेचा उद्देश नावातच स्पष्ट आहे. केलेली गुंतवणूक रक्कम रक्कम सुरक्षित असणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या प्रकारच्या योजना ह्या मुदत बंद (closed-end type Mutual funds) प्रकारातील आहेत.   ह्या योजना साधारणपणे १, ३, ५ वर्षासाठी मुदत बंद असतात. या योजनेमार्फत गुंतवणुकीतील जास्तीचा भाग हा डेट प्रकारामध्ये (Money market Instrument, T-Bills, CP, CD and Bonds ) गुंतवणूक केला जातो. डेट प्रकारातील गुंतवणूक इक्विटी च्या तुलनेने कमी जोखमीची असतात. त्यामुळे कमी जोखीम सुरक्षित परतावा ह्या प्रकारात या योजना मोडतात. नवीन योजना जाहीर (New fund offer) झाले नंतर आपण ह्या योजनेत पैसे गुंतवू शकतो. त्या मुदतीनंतर ज्या बाजारामध्ये या फंडाची नोंदणी होते त्या ठिकाणी आपण खरेदी किंवा विक्री करू शकतो.

पोर्टफोलिओ ची रचना:

साधारणपणे या फंडाची रचना ८०-२० म्हणजे ८०% गुंतवणूक डेट प्रकारांत (मनी मार्केट मधील गुंतवणूक) तर उरलेली २०% इक्विटी प्रकारांत केली जाते. डेट प्रकारातील गुंतवणूक कमी जोखमीची असल्याने भांडवल सुरक्षेचे (Capital Protection) शक्यता वाढते तर २०% रक्कम इक्विटी मध्ये गुंतवणूक होत असल्याने भांडवल वृद्धी चा (capital appreciation) फायदा मिळू शकतो.  डेट प्रकारातील गुंतवणूक हि मुदत बंद कालावधीच्या अनुषंगाने केली जाते.

उदाहरणासाहित स्पष्टीकरण

समजा आपण भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजनेत (Capital Protection-Oriented Fund) रुपये १००० एक वर्षे बंद मुदतीसाठी गुंतवले तर साधारण पणे त्याचा पोर्टफोलिओ खालील प्रमाणे बनू शकतो.

डेट प्रकारातील गुंतवणुकीचा परतावा वार्षिक १०% आहे असे समजू.

आता गुंतवणूक करताना, डेट प्रकारात किती रक्कम गुंतवणूक  करावी म्हणजे वार्षिक  परतावा १०% दराने आपणांस रुपये १०००मिळतील.

आपण रुपये ९१० एक वर्षासाठी डेट प्रकारात  गुंतवले तर १०% परताव्याने रुपये १००१ (९१०+९१) वर्ष अखेरीस मिळतील. मग आता उरलेली रुपये ९० (१०००-९१०) इक्विटी प्रकारात गुंतवणूक केली म्हणजे यातून भांडवल वृद्धीचा फायदा मिळेल.

Capital Protection-Oriented Fund

आता प्रश्न असा पडेल कि जर फक्त गुंतवणूक सुरक्षा हवी असेल तर ह्या फंडात का गुंतवणूक करावी. किंवा बँक मुदत ठेव (Bank Fixed Deposit)किंवा म्युच्युअल फंडाच्या मुदत बंद योजेनेमध्ये (Fixed Maturity Plan) मध्ये का गुंतवणूक करू नये?. या तीन गुंतवणूक प्रकारांत काय फरक आहे.

Difference Between Capital Protection-Oriented Fund, Fixed Maturity Plan and Bank FD

मुद्दा / गुंतवणूक CPOF   FMP Bank FD
गुंतवणूक उद्देश गुंतवणूक सुरक्षा आणि भांडवल वृद्धी गुंतवणूक सुरक्षा आणि सुरक्षित परतावा गुंतवणूक सुरक्षा
गुंतवणूक कुठं केली जाते सुरक्षित डेट प्रकार आणि इक्विटी डेट प्रकार डेट प्रकार
उदा. ८०% (Money market Instrument, T-Bills, CP, CD and Bonds)२०% इक्विटी १००% Money market Instrument, T-Bills, CP, CD and Bonds सुरक्षित गुंतवणूक (बँकेकडून)
गुंतवणूक रक्कम सुरक्षेची हमी नाही नाही आहे (१ लाख रुपये पर्यंत)
फंड व्यवस्थापन प्रकार सक्रिय (Active) असक्रिय (Passive) असक्रिय (Passive)
मुदत बंद कालावधी १,३,५ वर्ष एक वर्षापेक्षा कमी काही दिवसांपासून ते १० वर्ष  (बँक ठरवते)
परतावा निश्चित नाही निश्चित निश्चित
कर इंडेक्सशन फायदा आहे (indexation benefit) इंडेक्सशन फायदा आहे  (indexation benefit) व्यक्तिगत कर रचनेनुसार: as per person’s tax slab)

शब्दार्थ:

  • Capital: भांडवल
  • protection-oriented: सुरक्षाभिमुख
  • CPOF: Capital Protection-Oriented Fund: भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना
  • FMP: Fixed Maturity Plan:  ठराविक मुदतीच्या मुदत बंद योजना
  • Bank FD: बँकेतील मुदत ठेवी

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *