About Us

मराठी.कॉम विषयी (About MarathiMoney.com)

नमस्कार

मराठीमनी.कॉम वर आपले स्वागत आहे. रोजचे वर्तमानपत्र (ई – वर्तमानपत्र) वाचून झाल्यावर इतर बरेच संकेतस्थळांना भेट देणे हा माझा नित्यक्रम झाला आहे. राजकारण आणि इतर बातम्या वाचण्यापेक्षा काहीतरी रोजच्या जीवनात फायदा होईल आणि ज्ञानात भर पडेल अशा हेतूने फायनान्स, अर्थशास्त्र अशा विषयांचे वाचन सुरु केलं (स्वत: या क्षेत्राशी निगडीत आहे ). बरीच पुस्तकही वाचून झाली. परंतु या विषयावर मराठीत जशी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत तशी अनेक संकेत स्थळं उपलब्ध नाहीत असं जाणवलं. गुंतवणूक आणि मराठी माणूस यांचं समीकरण तसं काही फार चांगलं आहे असं म्हणता येणार नाही ती मक्तेदारी गुजराथी, मारवाडी किंवा अण्णा लोकांची.

आधुनिक काळामध्ये गुंतवणूक आणि एकूण अर्थकारणाविषयक अद्यावत माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु मराठीमध्ये वर्तमानपत्र सोडून अर्थविषयक माहिती फार कमी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मराठीमनी.कॉम हे संकेतस्थळ केवळ अर्थशास्त्र आणि गुंतवणूक याविषयी केवळ मराठीतून अर्थसाक्षरता या उद्देशाने बनवली आहे.

मित्रहो या संकेतस्थळासाठी स्वतःच बहुमूल्य वेळ आणि पैसे खर्च करून केवळ मराठीतून अर्थसाक्षरता या उद्देशाने बनवली आहे . येथे कुठलाही गुंतवणूक विषयक सल्ला दिला जात नाही परंतु गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी लागणारी अचूक माहिती आणि संदर्भ उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. या संकेतस्थळावर कुठल्याही प्रकारची अर्थविषयक उत्पादने विक्रीसाठी नाहीत.

संकेतस्थळास भेट देताना काही चुका/ त्रुटी आढळल्यास जरूर कळवा. सूचनांचे नेहमीच स्वागत आहे.

(Email ID: admin@marathimoney.com)

 
धन्यवाद.